१- फेब्रुवारी लेखा व कोषागारे दिन सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्त कोषागार कार्यालय सातारा मधील अधिकारी व कर्मचारी वृंदाच्या वतीने
सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
१ फेब्रुवारी लेखा व कोषागारे दिनाच्या निमित्ताने या कार्यालयात कार्यालयीन परिसर स्वच्छता , रांगोळी स्पर्धा चे आयोजन करणेत आले होते. तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले.
या मध्ये निवृत्तीवेतन विभागामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २९८ Revision Authority ह्या १ फेब्रुवारी लेखा व कोषागारे दिनाचे औचित्य साधून दि. १ फेब्रुवारी २०१२ पूर्वी पूर्ण करण्याचे योजले होते व त्या प्रमाणे निवृत्तीवेतन विभागातील सर्व अधिकारी , कर्मचारी व परिविक्षाधीन अधिकारी (म.वि.ले.से.गट-ब ) तसेच कार्यालयातील इतर कर्मचार्यांनी मिळून सदर कामाचा परिपूर्ण निपटारा केला.
दिनांक १ फेब्रुवारी २०१२ रोजी सामाजिक बांधीलकी म्हणून कोषागार कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यासाठी सिव्हील सर्जन सातारा यांनी डॉ.श्री. संजोग कदम यांचे वैद्यकीय पथक पाठवून दिले. त्यास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, परिविक्षाधीन अधिकारी यांचे कडून चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या अधिकारी - कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले .
तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची शारिरीक तपासणी अतंर्गत हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी करणेत आली. या बाबत डॉ.श्री. संजोग कदम यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
वाहन चालविताना कोणती दक्षता घ्यावी , कोणत्या नियमांचा अवलंब करावा लागतो,वाहन चालविताना हेल्मेटचा वापर का करावा याबाबत माहिती होण्यासाठी श्री गुजराथी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांनी मार्गदर्शन केले. या बाबींचे गांभीर्य सर्वाना कळावे यासाठी यावेळी त्यांनी याबाबतच्या क्लिप्स दाखविल्या.